सोन्याचा भाव गडगडला… घ्यायचं असेल घेऊन घ्या…

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । गेल्या काही दिवसांपासून वाढत असणारा सोन्याचा भाव गडगडला असून सोने प्रति तोळा २६० रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोन्यासोबत चांदीच्या भावात देखील मोठी पडझड झाली असून १ किलो चांदीचा भाव १,१०० रुपयांनी कमी झाला आहे.

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव कालपेक्षा  २६ रुपयांनी कमी होऊन ४,८२३ रुपये झाला आहे. १० ग्रामचा दर ४८,२३० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,५९३ रुपये इतका असून १० ग्रामसाठी तुम्हाला ४५,९३० रुपये मोजावे लागतील. २२ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति ग्राम २५ रुपयांची घट आली आहे.

यासोबतच १ ग्राम चांदीचा भाव आज ७४.६ रुपये असून १.१ रुपयांनी हा भाव कमी झाला आहे. १ किलोचा दर ७४,६०० रुपये इतका आहे.