अधिकमासाच्या मुहूर्तावर ग्राहकांना दिलासा; आज सोन्याचे दर गडगडले, जाणून घ्या आजचे ताजे भाव

मे 26, 2026 1:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात सातत्याने चढ-उतार सुरु आहे. काल आठवड्याच्या सुरुवातीला, म्हणजेच सोमवारी सोन्याच्या दरात प्रति तोळा ३२० रुपयांची वाढ झाली होती. मात्र आज मंगळवारी बाजारात नफा वसुली झाल्याने सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.

gold 1 jpg webp

किती आहेत सोन्याचा भाव?

भारतात २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹१५,८८९ असून, तो सोमवारी असलेल्या दरापेक्षा ₹४९ ने कमी आहे. २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹१४,५६५ असून, तो कालच्या भावापेक्षा ₹४५ ने कमी आहे. १८-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹११,९१७ असून, तो कालच्या भावापेक्षा ₹३७ ने कमी आहे.

२४-कॅरेट सोन्याचा भाव
आज मंगळवारी २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹१५,८८९ असून, तो कालच्या भावापेक्षा ₹४९ ने कमी आहे. दरम्यान, २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,५८,८९० असून, तो कालच्या भावापेक्षा ₹४९० ने कमी आहे.

२२-कॅरेट सोन्याचा दर
२२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹१४,५६५ असून, तो कालच्या भावापेक्षा ₹४५ ने कमी आहे. दरम्यान, २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,४५,६५० असून, तो कालच्या भावापेक्षा ₹४५० ने कमी आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य कराराबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या होत्या. यामुळे जगभरात महागाईची भीती आणि व्याजदरवाढीची शक्यता निर्माण झाली होती. याच जागतिक घडामोडींचा परिणाम म्हणून बाजारात झालेल्या नफा वसुलीमुळे (प्रॉफिट बुकिंग) आंतरराष्ट्रीय स्तरासह देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याचे दर खाली आले आहेत.

महाराष्ट्रात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या ‘अधिक मास’ अर्थात ‘धोंड्याच्या महिन्याला’ नुकतीच रविवारपासून सुरुवात झाली आहे. या संपूर्ण महिन्यात जावयाला वाण देण्यासाठी तसेच धार्मिक कार्यासाठी सोने-चांदी खरेदीची मोठी परंपरा आहे. अधिकमासामुळे बाजारात आधीच खरेदीचा उत्साह असताना, आज सोन्याचे दर घसरल्याने रिटेल बाजारात ग्राहकांची गर्दी आणखी वाढेल, असा अंदाज व्यापारी सूत्रांनी व्यक्त केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now