इंधनाच्या भडक्यापाठोपाठ जळगावच्या सुवर्णपेठेत सोनंही कडाडलं; आता प्रति तोळ्याचा भाव काय?

मे 25, 2026 4:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२६ । देशात इंधन दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून आज सोमवारी पेट्रोलचे दर 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढले आहे. यानंतर जळगावच्या सराफा बाजारातूनही सर्वसामान्यांचे बजेट कोलमडवणारी बातमी आली आहे. इंधनाच्या भडक्यापाठोपाठ आता सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे, ऐन अधिकमासाच्या (पुरुषोत्तम मास) मुहूर्तावर चांदीच्या किमती गगनाला भिडल्याने यंदा जावयाला परंपरेनुसार ‘वाण’ (भेट वस्तू) देणे सासऱ्यासाठी आर्थिकदृष्ट्या मोठे कठीण झाले आहे.

gold silver jpg webp

जळगावच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात तब्बल 500 रुपयांची वाढ झाली. काल सोन्याचे दर 1 लाख 56 हजार 500 रुपये होते. त्यात वाढ होऊन आज हे दर 1 लाख 57 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर मात्र कालप्रमाणेच आजही स्थिर आहेत.

दरम्यान, अधिकमासानिमित्त सासरकडून लेक-जावयाला चांदीच्या वस्तू वाण म्हणून भेट देण्याची परंपरा हिंदू संस्कृतीमध्ये आहे. मात्र यंदा चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने ही परंपरा निभावणे अनेकांसाठी आर्थिकदृष्ट्या कठीण झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत चांदीच्या किमतीत तब्बल एक लाख रुपयांहून अधिक वाढ झाल्याचे चित्र आहे.

यामुळे यंदा वाण देताना ग्राहकांना कमी वजनाच्या आणि कमी किमतीच्या चांदीच्या वस्तूंवर समाधान मानावे लागत आहे. अधिकमासामुळे चांदीच्या वाणासाठी ग्राहकांची संख्या वाढली असली तरी वाढत्या दरांमुळे ग्राहक स्वस्त पर्यायांकडे वळत असल्याची माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी दिली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now