जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२६ । गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि मध्य-पूर्वेतील तणावामुळे सोने-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सातत्याने वाढणारे सोन्याचे दर आता पुन्हा घसरू लागले असून जळगाव सराफा बाजारात गेल्या २४ तासांत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. यामुळे ऐन लग्नसराईत ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

असे आहेत दर:
जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी सोन्याचा दर प्रति तोळा १ लाख ६२ हजार ९४६ रुपये इतका होता. मात्र त्यात गेल्या २४ तासात तब्बल १ हजार ७५१ रुपयांची घट झाल्याने सोन्याचा भाव १ लाख ६१ हजार १९५ रुपये प्रति तोळ्यावर आला. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून चांदी तब्बल ४ हजार १२० रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या चांदीचा दर २ लाख ७८ हजार १०० रुपये प्रति किलोवर स्थिरावला आहे.

घसरणीचे कारण काय?
अमेरिकन डॉलर इंडेक्स आणि बाँड यील्डमध्ये होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम सोने-चांदीवर होतो. तसेच सध्या मध्य-पूर्वेत सुरू असलेले युद्ध व भू-राजकीय अनिश्चिततेमुळे सोने-चांदीत तेजी-मंदी सुरु आहे. अमेरिकन डॉलर इंडेक्स आणि बाँड यील्डमध्ये होत असलेल्या बदलांचा थेट परिणाम सोने-चांदीवर होत आहे. भू-राजकीय सुरक्षित सोन्याकडे अनिश्चिततेमुळे गुंतवणूक म्हणून पाहिले जात असले तरी, उच्च पातळीवर गुंतवणूकदारांनी नफा वसुली सुरू केल्याने दरात अचानक घसरण झाली आहे.











