सोने दरात पुन्हा मोठी वाढ ; आजचा प्रति 10 ग्रॅमचा भाव काय?

जानेवारी 20, 2024 11:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२४ । सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहे. मागील काही दिवसापासून दोन्ही धातूंच्या किमतीत घट दिसून आली. मात्र आठवड्याच्या शेवटच्या दिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. यामुळे सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव पुन्हा ६३ हजार रुपयांवर गेला आहे. आजचे भाव जाणून घ्या..Gold Silver Rate 20 January 2024

gold silver jpg webp

डिसेंबर महिन्यात दरवाढीचा नवीन उच्चांक गाठल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला होता. सोन्याचा दर विनाजीएसटी ६४ हजार रुपयांवर गेला होता. तर चांदीचा दर ७७ हजार रुपयावर होता. मात्र या नवीन वर्षांत किंमतीत घसरण झाल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.

जळगाव सुवर्णनगरीत मागील तीन दिवसात सोन्याच्या किमतीत जवळपास ६०० ते ७०० रुपयापर्यंतची घसरण झाली होती. तर चांदीचा दर देखील जवळपास १००० हजार रुपयांनी घसरला होता. मात्र काल सायंकाळी सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ झालेली दिसून आली.

आज शनिवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ६३००० रुपयावर विकला जात आहे. तर चांदीचा दर विनाजीएसटी ७२५०० रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now