सोने 2200 रुपयांनी, तर चांदीत 4400 रुपयांची घसरण ; आजचा भाव तपासून घ्या…

फेब्रुवारी 2, 2024 10:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज | 2 फेब्रुवारी 2024 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यांनतर सोन्या-चांदीच्या किमतीत बदल झाला आहे. बजेटनंतर सोने वधारले तर चांदी घसरली आहे. वाढीनंतर प्रति तोळा सोन्याचा भाव ६३ हजार रुपयावर विकला जात आहे. दरम्यान, डिसेंबर २०२४ महिन्यात नवीन रेकॉर्ड करणाऱ्या सोन्यासह चांदीच्या किमतींनी जानेवारी महिन्यात ग्राहकांना दिलासा दिला आहे. Gold Silver Rate 2 February 2024

gold silver jpg webp

दिवाळी 2023 नंतर सोने-चांदीने रॉकेट भरारी घेतली आहे. डिसेंबर महिन्यात तर मौल्यवान धातूच्या किंमतींनी नवीन रेकॉर्ड केला. यामुळे ऐन लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला होता. मात्र गेल्या जानेवारी महिन्यात सोने-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आली.

जानेवारीत सोने चांदीत मोठी घसरण
जानेवारी महिन्यात सोने 2200 रुपयांनी उतरले. अखेरच्या आठवड्यात त्यात वाढ दिसली. 31 जानेवारी रोजी भाव स्थिर होता. त्यापूर्वी दोन दिवसांत सोने 320 रुपयांनी वधारले. तर 1 फेब्रुवारी रोजी सोने 170 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

जानेवारीत चांदीने देखील ग्राहकांना दिलासा दिला. चांदीत 4400 रुपयांची घसरण झाली. तर जानेवारीच्या शेवटच्या सत्रात चांदीत 2 हजार रुपयांची वाढ झाली होती. 31 जानेवारी रोजी किंमती स्थिर होत्या. 1 फेब्रुवारी रोजी किंमतीत 200 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,300 रुपये आहे.दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now