सोने-चांदीत ‘कोसळ’धार ; जळगावात तीन दिवसात दरात मोठी घसरण, पहा आजचे भाव?

जानेवारी 19, 2024 10:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२४ । लग्नसराईचे दिवस असून यादरम्यान सोने आणि चांदीच्या किमतीने दिलासा दिला आहे. भावात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार घसरण झाली. जळगाव सुवर्णनगरीत या तीन-चार दिवसांत सोने ६५० ते ७०० रुपयांनी तर चांदी १००० रुपयांनी उतरली. यामुळे सोन्याचा दर ६३ हजाराखाली आला आहे. Gold Silver Rate 19 January 2024

gold silver jpg webp

सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याने ग्राहकांची पावले आपोआप सराफा बाजाराकडे वळली. डिसेंबर महिन्यात दरवाढीचा नवीन उच्चांक गाठल्यानंतर या नवीन वर्षांत किंमतीत घसरण झाल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. जळगाव सुवर्णनगरीत आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी ६३१०० रुपये इतका होता.

त्यांनतर मंगळवारी सकाळच्या सत्रात त्यात शंभर रुपयांची घसरण होऊन तो ६३००० हजार रुपयावर आला. बुधवारी पुन्हा १०० रुपयाची वाढ झाल्याने दर ६३१०० पुन्हा आला. गुरुवारी त्यात ३०० रुपयांची मोठी घसरण झाली. यामुळे सोन्याचा दर ६२८०० रुपयावर आला. काल सायंकाळी दरात पुन्हा ३५० रुपयाची घसरण झाली. यामुळे आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ६२,४५० रुपयावर आला आहे.

दुसरीकडे गेल्या तीन चार दिवसात चांदीच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली. सोमवारी (१५ जानेवारी) चांदीचा एक किलोचा विनाजीएसटी ७३५०० रुपयावर होता. मंगळवारी ५०० रुपयाची वाढ झाल्याने ७४००० रुपये इतका होता. बुधवारी त्यात १००० रुपयाची घसरण झाल्याने चांदी पुन्हा ७३००० हजार रुपयावर आली. गुरुवारी सकाळी पुन्हा ५०० रुपयाची घसरण झाल्याने ७२५०० रुपयावर दर आला. सायंकाळी भाव स्थिर दिसून आला. आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात चांदीचा एक किलोचा भाव विनाजीएसटी ७२५०० रुपयावर विकला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now