⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

होळीच्या सणासुदीला सोने-चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२२ । आज सलग चौथ्या दिवशी सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) किमतीत घसरण झाली आहे. आज जळगावच्या (Jalgaon) सुवर्णनगरीत सोन्याच्या किंमतीत ४२० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या १०५० रुपयांची घसरण झाली आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने ७६० रुपयाने तर चांदी ५३० रुपयाने स्वस्त झाली होती. दरम्यान, होळीच्या सणासुदीला सोनं आणि चांदी स्वस्त झाल्याने ग्राहकांसाठी खरेदीची संधी चालून आली आहे.

आजचा जळगावमधील सोने-चांदीचा भाव? Gold Silver Rate
आज गुरुवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,३५० रुपये इतका आहे. तर चांदी ६८,८८० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वाढले होते. एकीकडे शेअर बाजार कोसळला होता. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. त्यांनी आपला सारा मोर्चा सोन्याकडे वळवला होता. त्यामुळे सोन्याच्या दरात अचानक वाढ झाली होती. मात्र, आता रशिया आणि युक्रेन युद्धाची धग कमी होताना दिसतेय. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सोन्याचे दर कमी होताना दिसून येतायत. लगीनसराईच्या तोंडावर हा नागरिकांना मोठा दिलासा आहे, असेच म्हणावे लागेल.

जळगाव सराफ बाजारात युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन आठवड्यात सोन्याचा भाव जवळपास ४००० रुपयांची वाढ झाली होती. तर चांदीच्या भावात ६५०० ते ७००० हजार रुपयाची वाढ झाली होती. मात्र त्यानंतर आता दोन्ही धातूंचे दर घसरू लागले आहे. गेल्या चार दिवसात सोने २१५० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात जवळपास ३२५० रुपयाची घसरण झाली आहे.

कसे घसरले दर?

जळगावमध्ये १४ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५४,१२० रुपये होते. तर १५ मार्च रोजी ५३,५३०, १६ मार्च रोजी ५२,७७० आणि आज १७ मार्च रोजी ५२,३५० हे दर वर स्थिरावले आहेत. तर गेल्या आठवड्याच्या ७ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५३,७ ९०रुपये होते. तर ८ मार्च ला ५४,७७०, ९ मार्चला ५५,५५० असा होता. त्यानंतर हे दर सातत्याने घसरत आहेत.