⁠ 
रविवार, मे 5, 2024

ग्राहकांसाठी खुशखबर.. जळगाव दोन दिवसात सोने इतक्या रुपायांनी घसरले, वाचा 10 ग्रॅमचा भाव?

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या (Gold Price) भावात घसरण दिसून आलीय. आज गुरुवारी सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात किंचित घसरण झाली आहे. मात्र दुसरीकडे चांदीच्या (Silver Price) भावात वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा भाव पुन्हा 54 हजारांवर गेला आहे. परदेशी बाजाराच्या संकेतांमुळे हा परिणाम दिसून आला. दरम्यान, जळगाव सराफ बाजारात दोन दिवसात सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून आलीय. Gold Silver Rate Today

MCX वरील सोने आणि चांदीचा भाव?
MCX वर, 24-कॅरेट शुद्धतेचे सोने सकाळी 10 वाजेपर्यंत जवळपास 50 रुपयांनी घसरून 50,492 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​होते. आज मात्र चांदी महागली आहे. सकाळी चांदीचा प्रति किलोचा दर 150 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव 54,168 रुपयावर गेला आहे.

जळगावात दोन दिवसात सोने इतक्या रुपयाने घसरले :
जळगावातमध्ये आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 46,730 रुपये इतका आहे. तो दोन दिवसापूर्वी 47,200 रुपये इतका होता. तर आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 51,000 रुपायांपर्यंत आला आहे. दोन दिवसापूर्वी सोने 51,500 रुपयांपर्यंत होता. म्हणजेच दोन दिवसात 24 कॅरेट सोने जवळपास 500 रुपयांनी घसरले आहे. मात्र दुसरीकडे चांदीचा दर स्थिर असल्याचे दिसून आले. आज चांदीचा एक किलोचा भाव 54,500 रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्यात आणखी घसरणार?
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरावर दबाव आहे. देशात आता सणासुदीला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत सोन्याची मागणी वाढते. मात्र, दिवाळीपर्यंत सोन्यात आणखी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या जागतिक परिस्थिती पाहता अल्पावधीत सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता कमी दिसत आहे.