आजचा सोने-चांदीचा भाव : ९ सप्टेंबर २०२१

सप्टेंबर 9, 2021 10:21 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२१ । दोन दिवसाच्या घसरणीनंतर आज गुरुवारी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. आज जळगाव सराफ बाजारात सोने प्रति १० ग्रम १०० रुपयाने वाढले आहे. तर दुसरीकडे चांदी मात्र स्वस्त झाली आहे. चांदी प्रति किलो ४५० रुपयाने स्वस्त झालीय. त्यापूर्वी बुधवारी सोनं ५०० रुपयाने स्वस्त तर चांदी ६८० रुपयाने महागली होती.

gold silver jpg webp

मागील काही दिवसापासून सोने दर एका विशिष्ठ पातळीवरून वरखाली होतानाचे दिसून येत आहे. जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीत मोठी वाढ नोंदविली गेली होती. परंतु गेल्या दोन दिवसापासून सोने दर घसरत आहे. मात्र आज सोने दरातील घसरणीला ब्रेक लागला आहे.

ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास ८ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोनं दर कमी होत असल्याने सोन खरेदी करण्याची हीच चांगली संधी आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८१४ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,१४० रुपये आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव

चांदीचा एक किलोचा भाव ६५,६९० रुपये इतका आहे.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now