ग्राहकांना झटका! सोन्यासह चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ

जुलै 4, 2024 12:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२४ । जून महिन्यात सोने आणि चांदीच्या किमतीत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दरवाढीचे घौडे दामटले आहे. सोन्यासह चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

gold jpg webp

जळगावच्या सराफ बाजारात गेल्या आठवड्यापासून ८९ हजार रुपयांच्या आत असलेल्या चांदीच्या भावात बुधवारी एक हजार २०० रुपयांची वाढ होऊन ती थेट ९० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. सोन्याच्याही भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.

मे महिन्यात ९४ हजार रुपये अशा उच्चांकी भावावर पोहोचलेले चांदीचे भाव जून महिन्यात कमी झाले. त्यात २४ जूनपासून चांदी ९० हजारांच्या – आत आली. २७ जून रोजी तर ती ८८ हजार रुपये प्रति किलोवर आली – होती. त्यानंतर थोडीफार वाढ होत – जाऊन २ जुलैपर्यंत ती ८८ हजार ८०० रुपयांवर पोहोचली. ३ जुलै रोजी तर एकाच दिवसात थेट एक हजार २०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ९० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली.

यासोबतच सोन्याच्या भावातही ४०० रुपयांची वाढ झाल्याने सोने ७२ हजार ३०० रुपयांवरून ७२ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now