सोन्याचा भाव पुन्हा ५३ हजारांवर, जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव

मार्च 25, 2022 10:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२२ । सलग दुसऱ्या दिवशी सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) भावात वाढ दिसून आलीय.जळगाव सुवर्ण नगरीत आज १० ग्रॅम सोन्याच्या भावात ३२० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल १०९० रुपयाची वाढ झाली आहे. या दोन दिवसात सोने ७०० रुपयाने तर चांदी तब्बल १६०० रुपयांहून अधिकने वाढली आहे. आजच्या दरवाढीनंतर सोने पुन्हा ५३ हजारांवर गेले आहे.

gold jpg webp

आजचा जळगावमधील सोने-चांदीचा भाव? Gold Silver Rate
आज गुरुवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५३,३०० रुपये इतका आहे. तर चांदी ७०,९५० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

रशिया युक्रेनमध्ये जवळपास एक महिन्यापासून युद्ध सुरु आहे. या युद्धाची झळ जागतिक बाजारात दिसून आलीय. युद्धादरम्यान अनेक किंमती महागल्या आहे. त्यात सोने चांदीचे भाव देखील दोन वर्षाच्या उच्चांक पातळीपर्यंत पोहचले. या कालावधीत सोन्याचे प्रतितोळा दर ३ ते ४ हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सध्या सोन्याचा दर प्रतितोळा ५३ हजाराच्यावर गेला आहे.

या महिन्याच्या ९ मार्च रोजी सोने ५५ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर गेले होते. गेल्या ऑगस्ट २०२० मध्ये ५६ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर गेला होता. त्यानंतर या महिन्यात सोन्याने पुन्हा उच्चांक गाठला होता. गेल्या आठवड्यात सोने दरात जवळपास १७०० ते १८०० रुपयाची घसरण झाली होती. तर चांदीच्या दरात जवळपास २१०० रुपयाची घसरण झाली.मात्र या आठवड्यात सोने आणि चांदी दरात वाढ झालेली दिसून येतेय.

या आठवड्यातील दर?
जळगावमध्ये २१ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५२,६५० रुपये होते. तर २२ मार्च रोजी ५२,८७०, २३ मार्च रोजी ५२,५८०, २४ मार्च ५२,९८० तर आज ५३,३०० इतका आहे. तर दुसरीकडे २१ मार्च ला चांदी ६९,४७० प्रति किलो होती. २२ मार्च ६९,९५०, २३ मार्च ६९,२८०, २४ मार्च ला ६९,८६०, तर आज ७०,९५० रुपये इतका आहे.

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now