मंगळवार, सप्टेंबर 19, 2023

आजचा सोने-चांदीचा भाव ; २१ जुलै २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज ।२१ जुलै २०२१ । दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर आज बुधवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज जळगाव सराफ बाजारात प्रति १० ग्रॅमचा दर २६० ने वाढला आहे. तर चांदी स्वस्त झाली आहे. आज चांदी प्रति किलो ३०० रुपयाने स्वस्त झाले आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव प्रती औंस १८१८.२५ डॉलर झाला आहे. अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे यूएस बॉण्डयिल्डमध्ये घसरण झाली आहे. आर्थिक अनिश्चितता वाढल्याने गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याकडे वळाले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे बाजारात उलाढाल वाढली असल्याने सोन्याचे दर पुन्हा वाढीस लागले आहे.

जळगाव सराफ बाजारात  मागील दोन दिवसापासून सोन्याचे दर जैसे थे होते. तर आज चांदीच्या दरात घट झाल्याचे दिसून आले. परंतु आज सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. तर चांदीच्या दराने देखील ७० हजाराचा टप्पा गाठला होता. त्यानंतर सोन्याचे दर कमी झाले. तर जून महिन्यात जवळपास सोन्याच्या दर २००० हजार रुपयाने स्वस्त झाले होते.   

आजचा सोन्याचा दर

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८७५ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,७५० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४६४३ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४६,४३० रुपये आहे.

चांदीचा भाव

आज चांदी ६०० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७२,३०० रुपये इतका आहे.