जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२५ । सोने आणि चांदी दरात सध्या चढ उतार सुरु आहे. आज आठवड्याच्या शेवटची दिवशी सोने दरात वाढ दिसून आलीय. सोन्याच्या प्रति तोळ्यामागे ५० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. दरम्यान पुढील महिण्यापासून सणासुदीचे दिवस सुरु होणार असून या दिवसात अनेकजण सोने खरेदी करतात. परंतु सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न ग्राहकांना पडलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचे सोन्याचे दर

आजचे सोन्याचे भाव
आज सोन्याचे दर प्रति तोळा ५० रुपयांनी वाढले आहेत.८ ग्रॅम सोन्याचे दर ७९,५०४ रुपये आहेत. २४ कॅरेट (24k Gold Rate)सोन्याचे दर ९९,३८० रुपये प्रति तोळा आहेत. १० तोळ्यामागे ५५० रुपयांनी वाढ झाली आहे.

२२ कॅरेट
आज २२ कॅरेट सोन्याचे दर ९१,१०० रुपये प्रति तोळा आहे.२२ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील ५० रुपयांनी वाढ झाली आहे. १० तोळो सोन्याचे दर ९,११,००० रुपये झाले आहेत. या दरात ५००० रुपयांनी वाढ झाली आहे.
चांदीचे दर
आज चांदीच्या दरात फार काही बदल झालेला नाही. चांदीचे दर स्थिर आहेत. ८ ग्रॅम चांदीची किंमत ९११.२० रुपये आहेत. १० ग्रॅम चांदीचे दर १,१३९ रुपये आहेत. तर १०० ग्रॅम चांदीचे दर ११,३९० रुपये आहेत.











