सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ ; आता 10 ग्रॅमसाठी मोजावे लागतील एवढे पैसे

सप्टेंबर 15, 2021 10:28 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२१ । जळगाव सराफा बाजार पेठेमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. तर चांदीच्या घसरणीला आज ब्रेक लागला आहे. आज चांदी देखील महागली आहे.

gold silver jpg webp

आज जळगाव सराफ बाजारात सोने प्रति १० ग्रॅम ३६० रुपयाने महागले आहे. तर चांदी प्रति किलो ३०० रुपयाने महागली आहे. त्यापूर्वी काल सोने ११० रुपयाने महागले होते, तर चांदी प्रति किलो ३०० रुपयाने स्वस्त झालं होत. जळगाव सराफ बाजारात आज बुधवारी (१५ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४८,३७० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६५,०८० रुपये नोंदवले गेले.

जळगावमध्ये आठवड्यच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या दरात घसरण झाली होती. परंतु गेल्या दोन दिवसापासून सोने दरात वाढ होत आहे. मंगळवारी (१४ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,०१० होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४५,१८० रुपयांवर गेले होते. सोमवारी  (१३ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,९०० होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४५,२०० रुपयांवर गेले होते. रविवारी हेच दर कायम होते.

तर मागील गेले दोन दिवस चांदीच्या भावात घसरण झाली. सोमवारी प्रति किलो ६१० तर मंगळवारी ३०० रुपयाने चांदी स्वस्त झाली होती. परंतु आज चांदीच्या भावात वाढ झाली आहे.गेल्या २ दिवसात चांदी ९१० रुपयाने स्वस्त झाली.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आंतरराष्ट्रीय किमती घसरल्याने देशांतर्गत बाजारात सोने खरेदी करणे स्वस्त झाले. येत्या काळात किमती आणखी कमी होऊ शकतात. कारण अर्थव्यवस्थेशी संबंधित उपक्रम जगभरात सुधारले आहेत. म्हणूनच लोकांचा कल सोन्यापासून शेअर बाजाराकडे वळला आहे.

ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास ८ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.

दरम्यान, आता आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करत आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.

‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढंच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोनं साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now