आज सोनं-चांदी स्वस्त की महाग? तपासा जळगावातील प्रति तोळ्याचा दर

जुलै 9, 2021 9:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जुलै २०२१ । मागील काही दिवसापासून कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली होती. त्यामुळे सोन्याचा भाव ४८ हजारांपुढे गेला. मात्र आज शुक्रवारी सोन्याच्या दर वाढीला ब्रेक लागला आहे. आज सोन्याचा दर स्थिर आहे. मात्र, चांदीत मागील गेल्या तीन चार दिवसपासून घटत असल्याचे दिसून आले आहे. आज चांदी प्रति किलो ६०० रुपयांनी स्वस्त झाली.

gold

जळगाव सराफ बाजारात जून महिन्यात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.

सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. येत्या काळात सोन्याच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.  

आजचा सोन्याचा भाव 

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८१२ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,१२० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५८३ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४५, ८३० रुपये आहे.

चांदीचा भाव

आज चांदी ६०० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७३,५०० रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now