सोनं -चांदीच्या किंमतीत मोठी घट ; तपासा आजचा जळगावातील प्रति तोळ्याचा दर

ऑगस्ट 6, 2021 10:43 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ ऑगस्ट २०२१ । मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी पडझड दिसून येतेय. एक दिवसाच्या वाढीनंतर आज शुक्रवारी जळगाव सराफ बाजारात सोनं पुन्हा स्वस्त झालं आहे. तर चांदी देखील स्वस्त झालीय.

gold silver 5

आज सोने प्रति १० ग्रॅम २९० रुपयाने स्वस्त झालं आहे. तर चांदी ६२० रुपयाने स्वस्त झालीय. त्यापूर्वी काल सोनं ३०० रुपयाची वाढ तर चांदीच्या भावात ३२० रुपयाची घसरण झाली होती.   या आठवड्यात सोने ३ वेळा स्वस्त तर २ वेळा महागलं आहे. त्यात ९६० रुपयाने स्वस्त तर २७० रुपयाने महागले आहे.

सध्या कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीवर दबाव कायम आहे. त्यामुळे दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण सुरु आहे. जळगाव सराफ बाजारात जून महिन्यात सोन्याच्या भावात घसरण झाली होती. जवळपास १५०० ते २००० हजाराची घसरण झाली होती. मात्र, जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये सोन्याच्या किंमतीत जवळपास १५०० रुपयांनी वाढ झाली. दरम्यान, आगामी पाच वर्षांत १० ग्रॅम सोन्याचा दर ९० ​हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात सोन्याची वाटचाल कशी राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या किंमतीने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास ७ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.

आजचा जळगावातील सोन्याचा दर

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८७२ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,७२० रुपये असून त्यात आज २९० रुपयाची घसरण झाली आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव

चांदीचा एक किलोचा भाव ६९,५७० रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now