जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । गुजरात राज्यातील गांधीनगर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या नॅशनल गेम्स मध्ये सर्वच क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत पदक प्राप्त केले. त्यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या सॉफ्टबॉल क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या पुरुष संघाने सुवर्णपदक प्राप्त करत एक नवा इतिहास प्रस्थापित केला. त्या महाराष्ट्र संघाचे कर्णधार पद जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार जयेश यशवंतराव मोरे यांनी केले.

त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांचे परेडवर सत्कार करून माननीय पोलीस अधीक्षक एम राजकुमार सर,होम DYSP गावित सर,राखीव पोलीस निरीक्षक सोनवणे सर ,राखीव पोलीस उपनिरीक्षक पवार सर व गेम इन्चार्ज सम्रत वाघ सर यांनी त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.












