जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । एका वयवृद्ध दाम्पत्याला चक्क मुलगा व सुनेकडून मालमत्तेत हिस्सा द्यावा, यासाठी छळ केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दाम्पत्याने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.

सविस्तर प्रकार असा की, मालमत्तेत हिस्सा द्यावा तसेच ४० लाख रुपये मिळावे, यासाठी प्रेमविवाह केलेल्या मुलगा व सुनेकडून आपल्याला मारहाण होत असून शारीरिक व मानसिक छळ केला जात आहे. पोलिसांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. भविष्यात खोट्या गुन्ह्यात अडकवले जाऊ शकते, त्यामुळे आम्हाला न्याय हवा अशी आर्त हाक वृद्ध दाम्पत्याने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

मुलगा व सुनेने प्रेमविवाह केला आहे. या दोघांकडून आपल्यासह लहान मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची शक्यतादेखील पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
- कासोदा शिवारातील २३ शेळ्या-बोकड चोरीचा छडा; मध्यप्रदेशातून दोघे गजाआड






