⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

राष्ट्रीय युवा जल बिरादरीच्या राष्ट्रीय संयोजक पदी गिरीश पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२२ । दि 20 मार्च रोजी राष्ट्रीय जल बिरादरीचे अध्यक्ष जलपुरुष राजेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कवठेमहांकाळ संपन्न झालेल्या “राष्ट्रीय जलबिरादरी संमेलन” मध्ये जल बिरादरीच्या देशभरातील पदाधिकाऱ्यांच्या सर्वसंमतीने “राष्ट्रीय युवा जल बिरादरी” ची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या राष्ट्रीय संयोजक पदी जळगाव येथील योगी(युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया) संस्थेचे संस्थापक गिरीश पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा झाली. यासह राष्ट्रीय संयोजन समितीत मध्यप्रदेशचे पारस सिंह, महाराष्ट्र चे अंकुश नारायणगावकर, आसामच्या जुबी साहा, तेलंगणा च्या नर्मदा यांची निवड करण्यात आली आहे.

रॅमन मॅगसेसे प्राप्त राजेंद्र सिंहांच्या प्रेरणेने ही युवा जल बिरादरी देशभरातील युवकांना नदीच्या संवर्धनाच्या आणि पर्यावरण संरक्षणाच्या चळवळीत जोडण्याचे काम करेल.याच बैठकीत जुलै महिन्याच्या शेवटी पुणे येथे राष्ट्रीय युवा जल संमेलन होणार असल्याची घोषणा करण्यात आली.

गिरीश हा जळगाव जिल्ह्यातील वाघळूद येथील रहिवासी असून योगी संस्थेमार्फत ग्रामीण विकास व पर्यावरणीय प्रश्नांसाठी काम करतो आहे.सध्या तो फर्ग्युसन महाविद्यालय,पुणे येथे शिक्षण घेत आहे.

यावेळी महाराष्ट्र जलबिरादरीचे नरेंद्र चुग, विनोद बोधनकर, डॉ.स्नेहल डोंडे, डॉ.सुमंत पांडे, तेलंगणा जल बोर्ड चे अध्यक्ष व्ही.प्रकाश राव,कर्नाटक वाल्मी (Water And Land Resources Institute) चे संचालक डॉ.राजेंद्र पोद्दार तथा जलबिरादरीचे पदाधिकारी उपस्थित होते.