गिरीश महाजन त्यांची लायकी विसरले- एकनाथराव खडसे

एप्रिल 19, 2022 8:00 PM

girish mahajan eknath khadse

जळगाव लाईव्ह न्यूज | १९ एप्रिल २०२२ | गिरीश महाजन यांची लायकी विसरले असून एकेकाळी माझ्या पुढे मागे फिरणारा, माझं लांगुनचालन करणारा, निवडणुकीसाठी माझ्याकडून पैसे घेऊन जाणारा, गिरीश महाजन हा माणूस त्याचे जुने दिवस विसरला आहे. अशी घणाघाती टीका एकनाथराव खडसे यांनी भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर केली.

यावेळी एकनाथराव खडसे म्हणाले की, भुसावळचा मतदारसंघ हा भाजपाचा तर जामनेरचा शिवसेनेसाठी राखीव मतदारसंघ होता. मी गिरीश महाजन साठी प्रमोद महाजन यांच्याशी बोलून तो भाजपाला मिळवून दिला. मात्र गिरीश महाजन आता हे सगळे विसरले आहेत. ते आधी एकनाथराव खडसेच लांगुन चालन करायचे तर आत्ता देवेंद्र फडणवीस यांचे लनुंनचालन करत आहेत.

गिरीश महाजन यांची स्मरणशक्ती आता कमी झाली असून ते त्यांचे जुने दिवस विसरले आहेत अशी टीका एकनाथराव खडसे यांनी यावेळी गिरीश महाजन वर केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now