⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

शिवाजीनगर वाशियांचे पुल व रस्त्याच्या कामासाठी आंदोलन

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२१ । जळगाव शहरातील शिवाजीनगर पूल हा ‘टी’ किंवा ‘वाय’ आकाराचा बांधण्यात यावा आणि शिवाजीनगर ते लाकूडपेठमार्गे अवजड वाहतूक बंद करावे या मागणीसाठी आज ८ मार्च रोजी शिवाजीनगर वाशियांनी रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त केला. 

 

महानगर पालिकेचे शहर अभियंता अरविंद भोसले यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून येत्या सात दिवसात काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन करत यांनी आंदोलन मागे घेतले.

 

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवाजीनगर पुलाचे काम सुरू असल्यामुळे ममुराबादमार्गे यावल, चोपडा भागाकडे जाणारी वाहतूक शिवाजीनगर परिसरातून जात आहे. पुलाचे काम सुरू असल्यामुळे या भागातून तात्पुरती होत असलेली वाहतुक धोकादायक झाली आहे. परंतु पुलाच्या कामामुळे नागरिक हे सहन करीत आहे. पुलाचे टी आकाराचे  काम असल्यामुळे तात्पुरती ही वाहतूक असल्यामुळे सांगण्यात आले होते.

 

मात्र आता पुलाचा ‘टी’ आकार रद्द करून तो ‘एल’ आकाराचा करण्यात येत आहे. शिवाजीनगर ते लाकूडपेठ मार्गे ममुराबादकडे जाणारी वाहतुक कायम ठेवण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे. शिवाजीनगर हा अत्यंत रहदारीचा व दाट वस्तीचा भाग असून सध्या तात्पुरती सुरू असलेल्या मार्गावर मोठमोठी अवजड वाहने जात आहे. जर हा मार्ग कायम झाला तर महामार्गाची मोठी वाहने या भागातून जातील, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघाताचा धोका निर्माण होईल, तसेच धुळीचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांना विविध आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहे.