⁠ 
शुक्रवार, जून 14, 2024

टँकरच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वार तरुण ठार, आई गंभीर जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२४ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना वाढताना दिसत असून यात अनेकांना जीवावर मुकावे लागत आहे. यातच आता दुचाकीवर आईला सोबत घेऊन जात असलेल्या कुसुंबा येथील फोटोग्राफी करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाचा पाण्याच्या टैंकरखाली येऊन मृत्यू झाला. तर आई गंभीर जखमी असून तिच्यावर जीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास कुसुंबा गावालगत घडली.

शहरा लगत असलेल्या कुसुंबा येथील गणपतीनगरात अविनाश हरिश्चंद्र पाटील (वय १८) हा तरुण आई-वडील लहान बहिण यांच्यासोबत राहतो. शुक्रवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास तो त्याच्या दुचाकीने जात असताना गावातीलच पाण्याच्या टैंकर सोबत त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. यात टँकरच्या चाकाखाली येऊन त्याचा दुर्दैवी अंत झाला. तर त्याच्या आईलाही गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर जीएमसीत उपचार सुरू आहेत