सर्वसामान्यांना दिलासा: LPG सिलेंडर झाला स्वस्त, नवीन दर तपासा

मे 1, 2025 8:26 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२५ । दर महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे, यावेळीही अनेक गोष्टी बदलण्यात आल्या आहेत. यासोबतच तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही अपडेट केले आहेत. त्यानुसार १९ किलोच्या एलपीजी कमर्शियल सिलिंडरच्या किंमतीत कपात झाली आहे. कमर्शियल गॅसच्या किंमतीत १७ रुपयांनी कपात झाली आहे. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आला नाहीय.

gas

कपातीनुसार आज १ मे रोजी मुंबईत गॅस सिलिंडरची किंमत १६९९ रुपये झाली आहे. ही किंमत १७१३.५० रुपये होती. त्यामुळे व्यवसायिकांना, हॉटेलमालकांना याचा फायदा होणार आहे. कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात झाली आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरवर कोणताही परिणाम होणार नाही.

कोलकत्त्यात कमर्शियल सिलिंडर १८६८ रुपयांवरुन १८५१.५० रुपये झाली आहे. चेन्नईत गॅस सिलिंडरची किंमत १९०६.५० रुपये झाली आहे. ही किंमत १९२१.५० रुपये होती. तर घरगुती गॅस सिलिंडरची किंमत मुंबईत ८५२.२० रुपये झाली आहे.

गॅस सिलिंडरचे दर कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. सर्वसामान्य नागरिाकांवर याचा परिणाम होणार नाही. परंतु व्यावसायिक, हॉटेलमालक जे लोक जास्त प्रमाणात गॅस सिलिंडरचा वापर करतात त्यांच्या परिणाम होणार आहे. त्यांना दिलासा मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment