⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

वाकोद येथे जुगाराचे अड्डे, पोलिस कारवाईचा अभाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । जामनेर तालुक्यातील वाकोद हे गाव सुमारे १० हजार लोकसंख्येचे आहे. येथील बसस्थानकला लागूनच दोन्ही बाजूने चार ते पाच सट्टापेढ्या राजरोसपणे सुरू आहेत. यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

तर वाकोद बाजार भागात श्रीदत्तमंदिर परिसरात अनेक सट्टापेढया सरकारी कार्यालयाप्रमाणे चालवल्या जात आहेत. वाकोद ते आड नदीच्या पुलादरम्यान, वाकोद-तोंडापुर, पळासखेडा, वडगाव या रस्त्यावर वाघूर नदीच्या परिसरातील खळ्यांमध्ये, नदी काठावरील गोठे, आणि श्रीक्षेत्र चौंडेश्वर महादेव मंदिर परिसरातील शेतात ठिकठिकाणी जुगार अड्डे आहेत.