कोल्हे नगरात उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर

जुलै 2, 2022 2:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । शहरातील कोल्हे नगर आणि आशाबाबा नगर परिसरातील नागरिकांसाठी उद्या दि. ३ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेदरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन कोल्हेनगर (प) येथील शारदाश्रम विद्यालयात करण्यात आले आहे.

aarodya tapasni jpg webp

शिबिराला येथील समर्पण संस्थेच्या वतीने आणि मेहरून येथील सारा हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले आहे. तर मंगीलाल बाफना नेत्र पेढीच्या वतीने डोळ्यांची तपासणी केली जाणार आहे. शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह आणि इतर महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या केल्या जाणार आहेत. तसेच इतर सामान्य तपासण्या केल्या जाणार आहे. शिबिराचे उद्घघाटन प्रसिद्ध सर्जन डॉ. सुरेशचंद्र सूर्यवंशी यांचे हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे अनेक मान्यवर तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now