जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । प्लॉटधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन विकासकांना दोन वर्षांचा साधा कारावास व प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आली. असा निकाल न्या.गणेश गांधे यांनी सोमवारी दिला.
ललितकुमार पुसराज बोरा व हरीश रमाकांत दवे अशी या दोघा बिल्डर्सची नावे आहेत. बोरा व दवे यांचे चाळीसगाव तालुक्यातील वाघोली येथे जमीन आहे. यात प्लॉटमध्ये फसवणूक झाल्याने दीपक कुलकर्णी व त्यांच्या पत्नी यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावरुन दोघांविरुद्ध चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी होऊन दोघा आरोपींना दोन वर्षांचा साधा कारावास व प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आली.
या प्रकरणात सरकारी अभियोक्ता म्हणून सिद्धार्थ भाटे यांनी तर तपास अधिकारी म्हणून पोहेकॉ. अरुण पाटील यांनी कामकाज पाहिले. त्यांना पोलीस नाईक प्रकाश कोळी व पोलीस नाईक रणजित सोनवणे यांनी सहकार्य केले.
हे देखील वाचा :
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- Breaking : जळगावात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात
- बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाचा हृदयविकाराने मृत्यू ; यावल तालुक्यातील दुर्दैवी घटना
- धक्कादायक ! जळगाव शहरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबारीची घटना
- ऑनलाईन नंबर शोधणे पडले महागात; तरूणाला १० लाखात गंडविले