अमळनेरच्या माजी नगसेवक कस्तुराबाई महाले यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । अमळनेर येथील नगरपालिका माध्यमिक विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका तथा माजी नगरसेविका कस्तुराबाई महाले (वय ८८) यांचे आज १ जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

चित्रपट निर्माते दिग्दर्शक व हेमंतकुमार म्युझिकल्सचे हेमंतकुमार महाले, तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले व मुंबई महापालिकेचे उपायुक्त संजय महाले यांच्या त्या मातोश्री होत. त्यांची अंत्यययात्रा जिनगर गल्ली येथील राहत्या घरापासून सायंकाळी पाच वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.