भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांना पितृशोक; आदर्श शिक्षक डी. सी. चौधरी यांचे ८३ व्या वर्षी निधन

एप्रिल 2, 2026 8:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | जळगाव जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि सृष्टी हॉस्पिटलचे संचालक डॉ. राधेश्याम चौधरी यांचे वडील, धर्मराज चंपालाल चौधरी (डी. सी. चौधरी) यांचे गुरुवारी (२ एप्रिल) सायंकाळी ६.३५ वाजता निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

d-c-chaudhari

कै. डी. सी. चौधरी हे एक आदर्श शिक्षक म्हणून परिचित होते. त्यांनी भाटपुरा (ता. शिरपूर, जि. धुळे) येथील हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावली होती. त्यांच्या निधनाने शिक्षण तसेच सामाजिक वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पश्चात जळगावचे डॉ. राधेश्याम चौधरी, भाटपुऱ्याचे माजी सरपंच शैलेंद्र चौधरी आणि चोपडा येथील सृष्टी सीड्स व फर्टिलायझर्सचे संचालक नितीन चौधरी ही तीन मुले आणि सुना, नातवंड असा परिवार आहे.

कै. डी. सी. चौधरी यांची अंत्ययात्रा शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता त्यांच्या भाटपुरा (ता. शिरपूर, जि. धुळे) येथील राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी चौधरी कुटुंबीयांचे सांत्वन करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now