पॅन कार्ड बाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा ; वाचा काय म्हणाल्या निर्मला सीतारामन

फेब्रुवारी 1, 2023 11:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२३ ।  पॅन कार्डचा वापर सर्व सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये ओळखपत्र म्हणून केला जाईल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. याचबरोबर युनिफाईड फायलिंग सिस्टीम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.

pan card jpg webp

हाताने मैला उचलण्याची पद्धत बंद करणार, मशीनद्वारे मैला उचलला जाण्याची नवी योजना आणली जाणार आणि युद्धपातळीवर या योजनेची अंमलबजावणी करणार असल्याचे त्या म्हणाल्या

 2023-24 या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प 2023 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केले. पुढच्या ३ वर्षांत केंद्राकडून ३८,८०० शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी भरती करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली.

हा अर्थसंकल्प देशाच्या अमृत काळातला पहिला अर्थसंकल्प आहे. गेल्या वर्षी भारतात देशांतर्गत आणि विदेशी पर्यटकांचा वाढला आहे. यातून मोठ्या रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. अशावेळी पर्यटन हे रोजगार बनले आहे.असे त्या म्हणाल्या

याचबरोबर सर्वसमावेशक विकास, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक क्षमतांचा खऱ्या अर्थाने वापर करणे, हरित विकास, आर्थिक क्षेत्र प्राधान्य सरकारचे असणार असल्याचे यावेळी निर्मला सीताराम यांनी सांगितले. त्यासाठीच कृषी क्षेत्राचा विकासासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे असे त्या म्हणाल्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now