जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील एका तरुणाने कौटुंबिक वादातून आपल्या दोन चिमुकल्यांसह रेल्वेसमोर स्वतला झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज रविवारी सकाळी नगरदेवळा रेल्वेस्थानकावर घडली आहे. जितेंद्र दिलीप जाधव (रा. बोरखेडा ता. चाळीसगाव) असे पित्याचे नाव असून चिराग (वय ६) आणि खुशी (वय ४) असे मयातांची नावे आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी काय आहे घटना?
चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील जितेंद्र जाधव हा पत्नी पुजा आणि दोन मुलांसह वास्तव्याला असून तो चाळीसगाव येथील जे.जे. आण्णा टावर या मक्तेदाराकडे जेसीबी चालक म्हणुन काम करत होता. दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून जितेंद्र आणि त्याची पत्नी पुजा यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होता. या वादामुळे पुजा हिने तिचा भाऊ भुषण, काका सुधाकर व काकु यांना चाळीसगाव येथे बोलावुन ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये जितेंद्र याचे विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांनतर पुजा ही भाऊ, काका आणि काकुंसोबत माहेरी निघून गेल्या जितेंद्र हा दोघ मुलांना सोबत घेऊन बोरखेडा येथे आपल्या मुळगावी आला होता.
दरम्यान, आज सकाळी जितेंद्र जाधव याने चिराग व खुशी दोन्ही मुलांना गावातीलच बसस्थानकावरील हॉटेलवर पाववडे खाऊ घातले त्यानंतर सकाळी ११ वाजता सचखंड एक्सप्रेस रेल्वेसमोर मुलांसह स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. तिघेही दिसेनासे झाल्याने जितेंद्र याचा भाऊ व वडिलांनासह नातेवाईकांनी शोध घेणे सुरू केले. नगरदेवळा रेल्वेस्थानकावर जवळ त्यांचे नातेवाईक नाना अहिरे हे शोध घेत असतांनाच त्यांच्या नजरेस जितेंद्र, चिराग व खुशी ही दोन तुकडे झालेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांनी बोरखेडा येथे घटनेविषयीची माहिती दिली.
घटनेची माहिती पाचोरा येथील रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक शब्बीर शेख, हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार व प्रविण वाघ यांनी पंचनामा केला. याप्रकरणी रेल्वे पोलीसात अत्महत्येचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे बोरखेडा गावी मोठी शोककळा पसरली आहे.
हे देखील वाचा :
- भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवून जिंकू शकते – चंद्रकांत पाटील
- Avinash Bhosale : डीएचएफएल घोटाळा प्रकरणी अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक,
- जळगावात दुचाकी चोरीचे सत्र कायम : दोन दुचाकी लंपास
- Sex Worker : स्वमर्जीने वेश्या व्यवसाय गुन्हा नाही पण .. सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निर्णय
- मोठी बातमी : जिल्हा परिदेच्या राणधुमाळीला सुरुवात गट, गण प्रभाग रचनांचे काम सुरु
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज