विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी ‘मासू’चे अन्नत्याग साखळी उपोषण

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२१ । महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन अर्थात मासु हि एक अराजकीय विद्यार्थी संघटना असून विद्यार्थ्यांच्या न्याय, हक्क आणि अधिकारांसाठी न्यायिक स्वरूपात महाराष्ट्र भर कार्य करीत असून अन्यायाच्या विरोधात बंड पुकारून लढा देत आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियनतर्फे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व शिक्षणअधिकारी, शिक्षण सभापती जिल्हा परिषद, जळगाव यांना खासगी शाळेच्या मनमानी फीस घेण्याच्या व फीस न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून काढून टाकल्याचा प्रकार निवेदनातून कळवीला होता व त्यापासून विद्याथ्यांना व पालकांना यातून दिलासा मिळावा अशी केली होती. परंतु  कोणतेही उत्तर प्राप्त न झाल्यामुळे पुन्हा स्मरणपत्र सुद्धा देण्यात आलेले होते.

तरीदेखील अद्यापही कोणतीच ठोस कार्यवाही प्रशासना तर्फे करण्यात आलेली नाही जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून आज २३ रोजी महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियनतर्फे सर्व शासकीय नियमांचे व आदेशाचे पालन करून अन्नत्याग साखळी उपोषण करीत आहोत.

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासमोर जे आर्थिक संकट आले आहे त्यात सर्वसामान्य माणूस होरपळून निघालेला आहे अशातच काही खाजगी शाळा ह्या मनमानी पध्दतीने विद्यार्थ्यांकडून फीस आकारून त्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आलेले आहे. टाळेबंदीमुळे गेल्या दीडवर्षा पासून ऑनलाईन  शिकवणी सुरु आहेत तरी देखील काही शाळा ह्या कोविड सुरू होण्याआधी जितकी फीस आकारली जात होतीच त्याप्रकारे आताही फी आकारत आहेत. 

सध्याच्या परिस्थितीमुळे पालक हतबल झाले असून त्यांच्याकडे वेळेवर फीस भरण्याची पैसे नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणीतून बेदखल केले जात आहेत त्यामुळे त्यांच्या पाल्यांवर  शिक्षणापासून वंचित होण्याची भीती निर्माण झालेली आहे आणि भीतीपोटी आपल्या पाल्यावर अडचण येऊ शकते जसे की गुण कमी मिळणे ,त्या विद्यार्थ्यांवर काट खाणे किंवा कुठल्याही प्रकारे त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते व त्यांचे उज्वल भविष्यात अडचणी येऊ शकता  या खातीर पालक हे उघडपणे तक्रार करत नाही आहे.

तरी अश्या प्रतिकूल परिस्थितीत देखील सर्वसामान्य पालक आपल्या पोटाला चिमटा काढून शाळेची फीस भरण्यास तयार आहे परंतु सध्याच्या परिस्थितीचा विचार करता खासगी शाळांची मनमानी थांबवण्यासाठी आपण ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. म्हणून प्रशासना कडे वेळोवेळी मागणी केली होती कि खाजगी शाळेंनी फक्त शिकवणी शुल्क आकारून पालकांना फीस भरण्यासाठी सुलभ हफ्ते प्रदान करून विद्यार्थ्यांची  व त्यांच्या पालकांची गळचेपी थांबवावी परंतु प्रशासनाकडून कोणताच निर्णय होत नसल्याने नाईलाजास्तव आम्हाला विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी अन्नत्याग साखळी उपोषण करावे लागत आहे.

दिनांक २३ जुलै पासून आम्ही जळगांव जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जळगाव विभाग प्रमुख ऍड अभिजित जितेंद्र रंधे यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग साखळी उपोषण करणार आहोत याची दखला घेण्यात यावी. जर कोणतीही जीवितहानी या उपोषण दरम्यान झाली तर त्याची सर्व जबाबदारी जिल्हाधिकारी प्रशासन आणि राज्य सरकार यांची असेल. असेही महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियनने निवेदनात म्हटले आहे.