---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

ठाकरे – फडणवीस एकत्र दिसल्याने शिंदे गटात खळबळ?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | २३ मार्च २०२३ | विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरूआहे. यावेळी संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का देणारे चित्र पाहायला मिळाले. ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनामध्ये भेट झाली. या भेटीवेळी दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता.(fadanvis and thackray together in vidhan sabha)

shnide fadanvis and thakre 1 jpg webp webp

या दोघांच्या भेटीमुळे शिंदे गटामध्ये खळबळ उडाली असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव करत शिवसेनेवर ताबा मिळवला. आणि उद्धव ठाकरे हे कशाप्रकारे हिंदुत्वाच्या आणि बाळासाहेबांचा विचाराच्या विरोधातले आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला सांगायचा प्रयत्न केला. मात्र ज्या भारतीय जनता पक्षासोबत जाऊन शिंदे यांनी युती केली आणि मुख्यमंत्री झाले त्याच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने शिंदे गटामध्ये खळबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. किंबहुना अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.(fadanvis and thackray together in vidhan sabha shinde not happy

शिंदेंसोबत गेलेले 40 आमदार, १२ खासदार, नेते आणि कार्यकर्ते हे नेहमीच ठाकरेंचा विरोध करताना बघायला मिळतात, ठाकरे आणि शिंदे गट नेहमीच एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळतो. मात्र ज्या भारतीय जनता पक्षामुळे हे सगळ झालं. त्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सोबत उद्धव ठाकरे दिसल्याने शिंदे गटामध्ये खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

एका बाजूला ठाकरेंशी वैर घ्यायच आणि भारतीय जनता पक्षाला समर्थन द्यायचं अशी भूमिका घेतली गेली आहे. मात्र जर हे दोघे एकत्र आले तर आपलं काय? असा प्रश्न शिंदे गटातील कित्येकांना पडला असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाले आहेत. (shinde vs thakre and bjp)

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---