⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

खळबळजनक ! जिल्ह्यात मानवी वस्तीत बिबट्याने केली शेळीची शिकार

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२ जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारा परीसरात बिबट्याने शेळीची शिकार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. . पावसामुळे ट्रॅक्टरच्या ट्राँलीखाली बांधलेल्या बकऱ्यांपैकी एक बकरी उसाच्या फडात फरफटत ओढून नेत शिकार केल्याची घटना आज सोमवारी पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान वरखेडे खुर्द येथे घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी कि, वरखेडे खु. (ता.चाळीसगाव) येथील नाना दौलत तिरमली यांच्याकडे बकऱ्या आहेत. रविवारी पाऊस झाल्याने त्यांनी घरासमोर ट्रॅ्नटरच्या ट्रालीखाली बकऱ्या बांधल्या होत्या. पहाटे चार ते पाचच्या दरम्यान बिबट्याने एक बकरी फरफटत नेली. यावेळी ग्रामस्थांना चाहुल लागताच त्यांनी धाव घेतली. ज्या ठिकाणी बकरी फरफटत ऊसाच्या शेतात नेली, तेथपर्यंत ग्रामस्थ गेले. बिबट्याचा पगमार्क मिळून येताच या भीतीने नागरीक माघारी वळले. दिवस उजाडल्यानंतर बिबट्याने ज्या उसाच्या शेतात बकरी ओढून नेली होती; तेथे बकरी मृतावस्थेत आढळून आली.

या प्रकारामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली असून भयभीत झाले आहेत. रानात, शेतात पदोपदी बिबट्या दर्शन देत असुन पशुहानी देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. बिबट्याने आता चक्क मानवी वस्तीपर्यंत पोहचल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज घरासमोर बांधलेली बकरी बिबट्याने ओढून नेली. एखाद्या व्यक्तीवर हल्ला झाला तर? काय यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहे. वरखेडे शिवारात बिबट्याचा रहिवास असून वनविभागाकडुन काहीच कार्यवाही होत नाही. असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. बिबट्या आता मानवी वस्तीपर्यंत येवून पोहचल्याने नागरीकांची भीती पसरली असून वन विभागाने या बिबट्याला जेरबंद करावी अशी महागाई ग्रामस्त करत आहेत.