⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

चाळीसगावात चोरट्यांचा धुमाकूळ ; माजी सैनिकाचे बंद घर फोडून ३ लाखाचा ऐवज चोरी

जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । चाळीसगाव तालुक्यात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घटना आहे. अशातच माजी सैनिकाचे बंद घराचे कुलूप तोडून, घरातील लाकडी कपाटातून तीन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना चाळीसगाव शहरातील इच्छादेवीनगर भागात घडली. गेल्या पंधरा दिवसातील ही सहावी चाेरीची घटना असून यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

याबाबत असे की, माजी सैनिक संजय प्रताप राठोड हे २९ राेजी ते कुटूंबासह कन्नड येथे गेले हाेते. ३१ राेजी शेजारच्यांनी फोन करून कळविले की, त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तूटलेले आहे. राठाेड हे चाळीसगाव येथे तातडीने पाेहोचले. त्यांनी घरात जावून पाहीले असता चोरी झाल्याचा प्रकार समोर आला.
चोरट्यांनी लंपास केलेला ऐवज अशाप्रकारे चाेरट्याने बंद घरांचे कुलूप व कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला.

कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली १ लाख २० हजार किंमतीची ४० ग्रॅम वजनाची मंगलपोत, ४५ हजार रुपये किंमतीची १५ ग्रॅमची सोन्याची शॉर्ट पोत, ४५ हजार रुपये किंमतीचे १५ ग्रॅमचे सोन्याचे झुंबर, ९ हजार रुपये किंमतीची ३ ग्रॅमची सोन्याचे झुंबर, १५ हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅमचे कानातले वेल, ३६ हजार रुपये किंमतीचा १२ ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, ३० हजार रुपये किंमतीचे ६० भारचे चांदीचे हातातले दोन कडे व २ हजार ५०० रुपये किंमतीचे ५ भारचे चांदीचे ब्रेसलेट लंपास केले. चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पाच दिवसात दुसरी घरफोडी
शहरासह तालुक्यात चाेरी व घरफोडीच्या घटनांचे सत्रच सुरूच आहे. गेल्या गेल्या पंधरा दिवसातील ही चाेरीची सहावी घटना आहे. तर शहरात गेल्या पाच दिवसातील दुसरी घरफोडी घटना आहे. २६ राेजी शहरातील मालेगाव रस्त्यावरील रामकृष्णनगरमध्ये बंद घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे व रोख रक्कम असा सुमारे ९५ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरू नेला हाेता. गेल्या १५ दिवसांतील सर्व चोऱ्या बंद घरातच झाल्या आहेत. शहरात पाच दिवसांतील दोन घरफोडीच्या घटनांनी खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा :