जळगाव लाईव्ह न्यूज| १२ ऑगस्ट २०२३| प्रथमच आरोग्य भारती जळगाव तर्फे IMA हॉल येथे पर्यावरणाची कार्यशाळा आयोजित केलेली आहे. ही कार्यशाळा सकाळी १० वाजेपासून ते संध्याकाळी 5 पर्यंत होणार आहे. याठिकाणी पर्यावरण या विषयावर प्रदशनी ठेवणार आहेत. यामधे पर्यावरण समतोल वाचविणे, पाण्याचा योग्य वापर, नदी जल तलाव स्वच्छता, प्लास्टिक का वापरू नये, निसर्ग वाचविणे साठी कसे प्रयत्न करावे, वन औषधी वाढविणे, असे विविध विषय यावर प्रदर्शन असणार आहे.
सदरील कार्यक्रमात महाराष्ट्रातील पश्चिम क्षेत्रातील सर्व पर्यावरण प्रेमी निसर्ग व पर्यावरण या विषयावर काम करणारे लोक येणार आहे. यावर एक विशेष चर्चा सत्र याठिकाणी असणार आहे.
सदरील कार्यक्रमात केंद्रीय स्तरावरून डॉ. प्रवीण प्रभाकर, डॉ. सुनील जोशी, डॉ. सौ अनुराधा नरवणे यांचे विशेष संबोधन असणार आहे.
तसेच प्रमुख अतिथी ॲड. उज्वल निकम , डॉ. अविनाश महाजन अधिष्ठाता शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ,डॉ. सुनील नाहटा व डॉ. तुषार बेंडाले IMA सेक्रेटरी, हे असणार आहे.
तसेच देवगिरी प्रांताचे डॉ. मुकेश कसबेकर पश्चिम क्षेत्र संयोजक, डॉ. प्रकाश शिगेदार प्रांत अध्यक्ष,डॉ. रवी पाटवदकर प्रांत उप अध्यक्ष , डॉ. लीना पाटील प्रांत उपअध्यक्ष, श्री. विशाल बेद्रे सचिव , श्री. अप्पा कुलकर्णी हे असणार आहे. सदरील कार्यक्रमात भविष्यात पर्यावरण समतोल रहावा या साठी विशेष मार्गदर्शन असणार आहे. कार्यक्रमासाठी जळगाव आरोग्य भारती चे डॉ. पुष्कर महाजन ,कुणाल महाजन , असणार आहे.