⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुका – अजित पवार

जळगाव लाईव्ह न्यूज | २३ एप्रिल २०२२ | महाराष्ट्र राज्यात आज ओबीसी आरक्षण रखडल्याने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका थांबल्या आहेत. कित्येक कार्यकर्त्यांना असं वाटतंय की येत्या चार महिन्यात निवडणुका होणार नाहीत. मात्र असे गाफील राहू नका ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल त्यानंतर लवकरच निवडणुका जाहीर होतील. असा संदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी अजित पवार बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्यात कित्येक समस्या उभ्या आहेत. जातील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारीची आणि महागाईची. मात्र आपला विरोधी पक्ष आपल्याला इतर गोष्टींमध्ये भरकटत आहे. अशा गोष्टींकडे आपल्याला लक्ष देऊन चालणार नाही जनतेची जबाबदारी ही आपली जबाबदारी आहे.

याच बरोबर कोणत्याही ठिकाणी बोलताना आपण काय बोलतो याचं तारतम्य आपल्याला असायला हवं असेही यावेळी अजित पवार म्हणाले