⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | राजकारण | खडसे चौकशीपूर्वी पत्रकार परिषदेत टाकणार होते का बॉम्बगोळा?

खडसे चौकशीपूर्वी पत्रकार परिषदेत टाकणार होते का बॉम्बगोळा?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२१ । भाजपातून बाहेर पडल्यानंतर आपल्यामागे ईडीची चौकशी लागणार हे जवळपास एकनाथराव खडसेंना माहितीच होते. गुरुवारी खडसेंना चौकशीकामी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहायचे होते तत्पूर्वी ते १० वाजता पत्रकार परिषद घेऊन संवाद साधणार होते. एकनाथराव खडसे पत्रकार परिषदेत काहीतरी बॉम्बगोळा टाकणार असल्याची चर्चा होती परंतु त्या अगोदरच प्रकृती अस्वस्थतेमुळे पत्रकार परिषद रद्द झाल्याचे कळविण्यात आले. नेमक्या रात्रभरात काय घडामोडी घडल्या की खडसेंनी पत्रकार परिषद रद्द केली मात्र ईडीच्या चौकशीला ते सामोरे जाणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील राजस्थान सध्या दररोज बदलत असून अनेक मोठ्या घडामोडी घडत आहे. काही दिवसांपूर्वी बीएचआर प्रकरणात मोठी धरपकड करण्यात आली, अनेक दिग्गज अडकले. माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय गोत्यात आले. जळगावातील अनेक दिग्गज अडचणीत येत असताना महाजन गटाचे भवितव्य अंधारात जाणार का असे वाटत असतानाच अचानक फासे उलट फिरले आणि ईडीच्या चौकशीचा ससेमिरा खडसेंच्या मागे लागला. एकनाथराव खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने चौकशीकामी ताब्यात घेतले तर खडसेंना चौकशीकामी समन्स बजावण्यात आले.

एकनाथराव खडसे गुरुवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या चौकशीसाठी जाणार होते मात्र तत्पूर्वी १० वाजता ते मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून माहिती देण्यात आली. खडसे पत्रकार परिषदेत काहीतरी गौप्यस्फोट करणार अशी चर्चा होत होती. आपल्या कुटुंबापर्यंत बाब आल्यावर आपल्याकडे असलेल्या सर्वांच्या कुंडल्या बाहेर मांडण्याची वेळ आली असल्याचे बहुदा खडसेंना जाणवले असावे म्हणूनच त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती.

रात्री पत्रकार परिषदेची घोषणा झाली आणि सकाळीच पत्रकार परिषद रद्द केल्याची बातमी आली. प्रकृती अस्वस्थतेमुळे पत्रकार परिषद रद्द केल्याचे सांगण्यात येत असले तरी बहुदा त्यामागे दुसरेच कारण असल्याची चर्चा आहे. रात्रभरात केंद्र आणि राज्यस्तरावर अनेक मोठ्या घडामोडी घडल्या असाव्या त्यामुळेच पत्रकार परिषद रद्द केल्याचे बोलले जात आहे. खडसेंनी पत्रकार परिषद रद्द केली असली तरी ते ईडीच्या कार्यालयात चौकशीकामी जाणार आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.