⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | महाराष्ट्र | मागून येणाऱ्यांना संधी मिळते, आपल्याला सांगतात थांबा थांबा ; खडसे-माधुरी मिसाळ यांच्यातली चर्चा चित्रीत

मागून येणाऱ्यांना संधी मिळते, आपल्याला सांगतात थांबा थांबा ; खडसे-माधुरी मिसाळ यांच्यातली चर्चा चित्रीत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२४ । लोकसभा निवडणुकीनंतर माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असे बोलले जात होते. मात्र अद्यापही एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. भाजपमधील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे. एकनाथ खडसे यांचे भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्या सोबत चर्चा करतानाचा व्हिडिओ मराठी वृत्त वाहिनी एबीपी माझाने प्रसिद्ध केला आहे.

यावेळी दोघांमधील चर्चा रेकॉर्ड झाली आहे. यात एकनाथ खडसे हे माधुरी मिसळ यांच्या बोलताना मागून येणाऱ्यांना संधी मिळते. नव्याने संधी मिळते. आपल्याला सांगतात थांबा थांबा. हे वाईट आहे, असे बोलताना दिसून आले. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे.

या संभाषणावेळी आमदार अतुल भातखळकर देखील उपस्थित होते. आता एकनाथ खडसे यांनी हे वक्तव्य नक्की कोणाला उद्देशून केले, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये स्वगृही परतण्यास इच्छुक आहेत. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांच्यासाठी प्रचार केला होता. रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातूनसलग तिसऱ्यांदा निवडून आल्या आणि केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णीही लागली. लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असे बोलले जात होते. मात्र अद्याप एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. मंत्री रक्षा खडसे आणि एकनाथ खडसेंनी भेट घेतल्याने एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.