जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२२ । नवरात्रीचा सण माँ दुर्गेचा आशीर्वाद घेण्यासाठी साजरा केला जातो. नवरात्रीनंतर दसरा साजरा केला जातो. दसऱ्याला विजयादशमी, आयुधा पूजा असेही म्हणतात. हिंदू धर्माचा मुख्य सण, दसरा हा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा दसरा किंवा विजयादशमी हा सण आज ५ ऑक्टोबरला साजरा होणार आहे. या दिवशी रामाने लंकापती रावणाचा वध केला. त्यामुळे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा दसऱ्याला अनेक शुभ योगांचा विशेष मेळ निर्माण होत असल्याने या सणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

रावण दहन 2022 चा शुभ मुहूर्त
हिंदू धर्मात कोणतेही काम शुभ मुहूर्तानुसार करण्याची प्रथा आहे. रावण दहनदेखील याच प्रथेचा भाग आहे. यावेळी रावण दहन सूर्यास्तानंतर रात्री 8:30 पर्यंत आहे. रावण दहन नेहमीच प्रदोष काळात श्रावण नक्षत्रात केले जाते. त्याच वेळी, बंगाल विजयादशमीच्या दुपारच्या पूजेची वेळ दुपारी 01:20 ते 03:41 पर्यंत सुमारे 2 तास 21 मिनिटे असेल.

श्रावण नक्षत्र कधी सुरू होतेय?
श्रावण नक्षत्र हे 4 ऑक्टोबर 2022, रात्री 10:51 ते 5 ऑक्टोबर 2022, रात्री 09:15 ते रात्री पर्यंत आहे. नक्षत्र संपल्यानंतर 5 ऑक्टोबरला सूर्यास्तानंतर कधीही रावण दहन करता येऊ शकते.
दसऱ्याचे महत्व?
या दिवशी वाईटाचे प्रतीक असलेल्या रावणाच्या पुतळ्याचे दहन करून सत्याचा विजय करण्याची प्रथा आहे. दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या दसऱ्याच्या दिवशी एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात. या दिवशी काही लोक नवी वाहने, वस्तू तसेच कपड्यांची, सोन्याची खरेदी करतात. विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते. याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. महाराष्ट्रात घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच, घरोघरी सोनं म्हणून आपट्याची पानं देण्याची प्रथा आहे.
टीप : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. जळगाव लाईव्ह न्यूज त्याची पुष्टी करत नाही.











