वीज कोसळल्याने भर पावसातच झाडाने घेतला पेट, टळला मोठा अनर्थ

जुलै 10, 2022 10:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात मेघगर्जनासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक भागांना चांगलाच फटका बसला आहे. तसेच काही ठिकणी दुर्दैवी घटना देखील घडत आहेत. काल शनिवारी एरंडोल तालुक्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान निंबाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाने भर पावसात पेट घेतला. मात्र, मोठा अनर्थ टाळला.

toli

शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एरंडोल-धरणगाव रस्त्यावरील टोळी गावाजवळ लिंबाच्या झाडावर ही वीज पडली. त्यामुळे झाडाने भर पावसात पेट घेतला. सुदैवाने अनर्थ टळला. ही घटना घडली त्यावेळेस थोड्या अंतरावर समर्थ नर्सरी व सागर नर्सरी मध्ये रोपे विकत घ्याला आलेल्या ग्राहक व कामाला असलेले मजूर तसेच दिलीप लक्ष्मण पाटील यांच्या शेतात तीन शेतमजूर कोळपणी करत होते. सुदैवाने नर्सरी मधील व शेतात काम करणारे मजूर हे बालमबाल वाचले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now