नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) अंतर्गत येणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँड एलाइड सायन्स (INMAS), नवी दिल्ली येथे अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इंजिनियरिंग आणि सायन्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांना संरक्षण मंत्रालयाच्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची ही चांगली संधी मानली जात आहे. DRDO Apprentice Bharti 2026

कोण करू शकतो अर्ज?
या भरती प्रक्रियेत ग्रॅज्युएट आणि टेक्निशियन अप्रेंटिस अशी पदे उपलब्ध आहेत. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी उमेदवाराने बी.ई. किंवा बी.टेक पदवी पूर्ण केलेली असावी, तर टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी संबंधित शाखेतील डिप्लोमा आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे असणे बंधनकारक आहे.

इतके स्टायपेंड मिळणार
निवड झालेल्या उमेदवारांना १२ महिन्यांची अप्रेंटिसशिप दिली जाणार असून या कालावधीत ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी सुमारे १२,००० ते १२,३०० रुपये, तर डिप्लोमा धारकांसाठी १०,००० ते ११,००० रुपये दरमहा स्टायपेंड मिळणार आहे. यासोबतच विविध प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळणार असल्याने करिअरसाठी ही महत्त्वाची संधी ठरणार आहे.
उमेदवारांची निवड मेरिट लिस्टच्या आधारे केली जाणार असून इच्छुकांनी ईमेल किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. भरती प्रक्रियेची अधिक माहिती आणि अर्जाबाबतचे तपशील DRDO च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.










