जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । घरगुती गॅसचा उपयोग ऑटो रिक्षा, चारचाकी वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे केला जातो आहे. अशाच प्रकारे काळाबाजार करणाऱ्याच्या घरी १९ जानेवारी रोजी जिल्हापेठ पोलिसांनी छापा मारून २० हजार रुपयांचे साहित्य जप्त केले.

लियाकत खान शरीफ खान (रा. दंगलग्रस्त कॉलनी) याच्या घरी छापा मारला आहे. खान हा घरगुती गॅसचा काळाबाजार करतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार घराची झडती घेतल्यावर घरगुती गॅसची एक हंडी, रिक्षेत गॅस भरण्यासाठी लागणारी मोटार, नळी असे १९ हजार ५०० रुपयांचे साहित्य जप्त केले. पोलिस कर्मचारी विकास पहूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा :
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
- कासोदा शिवारातील २३ शेळ्या-बोकड चोरीचा छडा; मध्यप्रदेशातून दोघे गजाआड






