⁠ 
रविवार, मे 19, 2024

तारक मेहेतातल्या चाचाजींच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ ।  तारक मेहता का उल्टा चष्मा हि देशातील सर्वात लोकप्रिय टेलिव्हिजन मालिका आहे. या मालिकेने लोकप्रियतेच्या बाबतीत अनेक शिखरे गाठली आहेत. हे सर्व या मालिकेच्याच्या कलाकारांमुळे शक्य झाले आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांना या कलाकाराबद्दलची माहिती जाणून घेणे वाटतेच. आणि टेलिव्हिजनवर सर्वात जास्त टीआरपी असलेल्या या टीव्ही मालिकेतील पात्रांची आठवण येणारच.

जेठालाल, टप्पू, तारक मेहता, अंजली वहिनी, बबीता जी, माधवी वहिनी, आत्माराम तुकाराम भिडे, पोपटलाल, सोडी, कोमल, डॉक्टर हाथी अश्या कित्येक कलाकारांमुळे किंबहुना पात्रांमुळे आज हा शो इतका मोठा झाला आहे. मात्र या मालिकेमध्ये ज्यांचा आशीर्वाद या सर्व पात्रांवर आहे ते पात्र म्हणजे चंपक चाचा. हे पात्र साकारणाऱ्या नटाचं नाव आहे अमित भट खऱ्या अर्थाने म्हणायला गेलो तर अमित भट अत्यंत तरुण आहे. मात्र आपल्या अभिनयाच्या जोरावर इतकं उत्कृष्ट पात्र लोकांपुढे नेण्यास अमित भट यांना यश येत आहे.

चंपक चाचा म्हणजेच अमित भट यांचा वैयक्तिक आयुष्य देखील फार छान आहे. त्यांच्या पत्नीचे नाव तयाना असून त्या देखील दिसायला फार सुंदर आहेत. चंपक चाचा जरी अभिनयाने म्हातारी असले तरी अमित भट हे काही म्हातारे नाहीत. त्यांचं एक छान कुटुंब आहे त्यांच्या धर्मपत्नीचे नाव तयाना आहे.

2008 पासून तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बारा वर्षे झाली या मालिकेमध्ये काम करत आहेत. मात्र अमित भट यांच्या बद्दल बोलायला झालं तर सोळा वर्षापासून ते गुजरात मध्ये थेटर म्हणजेच नाटकांमध्ये काम करत आहेत. त्यांच्या या कामाला पसंत होऊनच तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेच्या दिग्दर्शकांनी चंपक चाचा ही भूमिका भट यांना करायची संधी दिली आणि या संधीचं भट यांनी सोनं केलं.