⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

तुम्हाला डायबेटिस आहे ? तर टाळा खाण्याचे हे पदार्थ

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । डायबेटिसच्या रुग्णांनी खाण्यापिण्याबाबत विशेष पथ्य पाळणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. त्यासाठीच या टिप्स –

साखरयुक्त पदार्थ, मध, सरबत, सीरप, कोल्ड्रिंक्स, गूळ, तूप, केक, पेस्ट्री, आइस्क्रीम, दारू, बीयर आदींचे , डायबेटिस झालेल्या रुग्णांनी सेवन करू नये.

ज्या भाज्या जमिनीत येतात, उदा. बटाटे, रताळू, इत्यादी भाज्या खाणे टाळाव्यात.

केळी, चिकू, आंबा, सीताफळ, द्राक्ष, पपई, पेरू, ऊस आदी फळे वर्ज्य करावीत.

काजू, मनुका, बदाम, भुईमुगाच्या शेंगा, अक्रोड आदी सुकामेवा टाळावा.

भात, वरण, दूध, पनीर, दही, मासे, विचडा आदी पदार्थ कमी प्रमाणात खावेत.

कच्च्या भाज्या उदा. मेथी, पालक, दुधीभोपळा, मुळा, कोथिंबीर, गोभी, चवळी, टोमॅटो, कांदा, कारले, कांद्याची पात, कैरी, लिंबूपाणी आदी पदार्थ भरपूर प्रमाणात खावेत.