ज्ञानेश्वर इगवे यांनी स्वीकारली विभागीय माहिती उपसंचालक पदाची सूत्र

सप्टेंबर 14, 2021 4:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२१ । नोव्हेंबर २०१६ पासून रिक्त असलेल्या नाशिक विभागीय माहिती उपसंचालक या पदावर ज्ञानेश्वर इगवे यांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली असून त्यांनी सोमवार दि.१३ रोजी नाशिकचे जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांच्याकडून या पदाची सुत्रं स्वीकारली.

new jpg webp

श्री. इगवे यापूर्वी मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वरिष्ठ सहाय्यक संचालक म्हणून वृत्तचित्र शाखेत कार्यरत होते.
श्री. इगवे यांनी नाशिक येथील यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठात दृकश्राव्य केंद्रात सन १९९१ ते २००३ याकाळात आपल्या सेवेची सुरूवात केली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात शासनाने सरळ सेवेने सन २००३ साली त्यांची वृत्तचित्र शाखेत वरिष्ठ सहाय्यक संचालक म्हणून नियुक्ती केली. त्यांनी २००८ ते २०१२ पर्यंत बीड व २०१२ ते २०१५ पर्यंत धुळे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर ते २०१५ पासून मंत्रालयात पुन्हा वरीष्ठ सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत होते. श्री. इगवे हे मुळचे बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील असून त्यांचे महाविद्यालयालयीन शिक्षण औरंगाबाद येथे झाले आहे. त्यांनी राज्यशास्र या विषयात एम.ए. केले आहे. तसेच वृत्तपत्र विद्या पदवी आणि नाट्यशास्त्र विषयात पदविका संपादन केली आहे.

श्री. इगवे यांनी सोमवार दि. १३ रोजी जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांच्याकडून पदभार स्वीकारला. याप्रसंगी सहाय्यक संचालक मोहिनी राणे, माहिती अधिकारी अर्चना देशमुख, उपसंपादक जयश्री कोल्हे, माहिती सहाय्यक किरण डोळस, प्रविण बावा व विभागीय माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now