दिवाळी सण : दृष्टीहीन बांधवांना मुस्लिम मनीयार बिरादरीतर्फे धनादेशचे वितरण

ऑक्टोबर 20, 2022 6:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२२ । राष्ट्रीय दृष्टीहीन संघ विभागीय शाखा नाशिक यांच्यामार्फत जळगाव येथे दिवाळीनिमित्त राष्ट्रीय दृष्टीहीन संघा तर्फे जागतिक पांढरी काठी दिन व दिवाळी चे औचित साधून गरजू बांधवांना पांढरी काठी,मिठाई व भेटवस्तूसाठी जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरी तर्फे राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राचे जळगाव जिल्ह्याचे प्रमुख मंगेश शेवाळे व डॉ. प्रवीण पाटील यांना बिरादरीच्या रथ चौक येथील कार्यालयात बिरादरीचे सहसचिव अब्दुल रऊफ़ रहीम यांच्या हस्ते ५० पांढऱ्या काठी साठी धनादेश देण्यात आला.

jalgoan 34 jpg webp

यावेळी बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, संचालक रफिक शेख व सिकलगल बिरादरीचे मुजाहिद खान आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now