सावदा येथे आषाढीनिमित्त धर्मिक कार्यक्रम व प्रसाद वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२१ । सावदा येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सकाळी महापुजा वै.जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांचे गादीपती ह.भ.प.धनराज महाराज अंजाळेकर यांचे शुभ हस्ते करण्यात आली.

यावेळी गांधी चौकातील सतीश महाराज जोशी यांनी धार्मिक पुजा पठन केले. यावेळी शहरातील भक्तगण यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत, व सोसल डिस्टनसिंग ठेवत दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला, आरती झाल्यानंतर 1 क्वींटल 25 किलो साबुदाणा खिचडी चे वाटप,तसेच माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय महाजन यांचे कङून 10 कॅरेट केळीचे व पेढे, राजगिरा लाडू चे वाटप करण्यात आले.

या वेळी शहरातील बांधवांचे सहकार्य लाभले. यावेळी मंदिरावर सुंदर फुलांची सजावट करण्यात आली होतो यामुळे आज एक वेगळे भक्तिमय वातावरण व प्रसन्नता अनुभवत नागरिकांनी येथे भावपूर्णरित्या विठुरायाचे दर्शन घेतले