युवासेनेतर्फे ‘ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर किटस्’चे वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२२ । शहरात शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेना जळगाव महानगरतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन शुक्रवार, दि. २७ मे रोजी शहरातील महाबळ कॉलनी येथे करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या उपस्थितीत ‘ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर किटस्’चे वाटप करण्यात आले.

shivsena 6

या प्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, शिवसेना उपनेते लक्ष्मणजी वडले, गजाननजी चव्हाण, जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांच्यासह उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, नगरसेवक नितीन बरडे, युवासेना सहसचिव विराज कावडिया, शिवसेना महिला आघाडी महानगराध्यक्षा शोभाताई चौधरी, शिवसेनेचे जळगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख शाम कोगटा, शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीप्रमुख जाकीर पठाण, शिवसेनेचे नितीन सपके, प्रशांत सुरळकर, शिवराज पाटील, अमित जगताप, स्वप्नील परदेशी, विशाल वाणी आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now