⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

धरणगावला तालुकास्तरीय विज्ञान मेळावा व नाट्योत्सव स्पर्धा उत्साहात

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । धरणगाव येथील गटसाधन केंद्रात तालुकास्तरीय विज्ञान मेळावा व नाट्योत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कु.चेतना पुरुषोत्तम कोतकर या विद्यार्थ्यिनीचा प्रथम क्रमांक तर तालुक्यातील अनोरे येथील बी.जे .महाजन विद्यालयाचा स्वप्निल बाळकृष्ण पाटील यांचा द्वितीय क्रमांक आला.

विज्ञान नाट्य उत्सव स्पर्धेत धरणगाव येथील पी.आर. हायस्कूलचा प्रथम क्रमांक आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन धरणगावचे गट शिक्षण अधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी विज्ञान समन्वयक बी.आर.महाजन, सहसमन्वयक एन.आर. सपकाळे,भारती बागुल, विषय तज्ञ दिपक पाटील,मंदार चौधरी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक धरणगाव तालुक्याचे विज्ञान समन्वयक बी.आर. महाजन यांनी केले. तर सहसमन्वयक एन.आर.सपकाळे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनातील स्पर्धेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. शिक्षिका भारती बागुल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. या शैक्षणिक वर्षातील विज्ञान मेळाव्याचा विषय शास्वत विकासासाठी मूलभूत विज्ञान आव्हाने आणि शक्यता या विषयवार वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. सदरहून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धा पुढील आठवड्यात जळगाव येथे होणार असून त्यासाठी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्यात.